दुचाकीवरून कामावर जात असताना वाहनाच्या धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 20:04 IST2021-07-16T20:03:45+5:302021-07-16T20:04:06+5:30
अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल

दुचाकीवरून कामावर जात असताना वाहनाच्या धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १० जून रोजी मुंबई-बंगळुरू महामार्गावर हिंजवडी परिसरात शनिमंदिराजवळ घडली.
प्रमोद दिगंबर कुलकर्णी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस ज्योतिराम झेंडे यांनी १५ जुलै रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद कुलकर्णी हे त्यांच्या दुचाकीवरून मुंबई-बंगळुरू महामार्गावरून कामावर जात होते. सकाळी सव्वाआठच्या सुमारास ते हिंजवडी परिसरातील शनिमंदिराजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. दरम्यान अज्ञात वाहनचालक जखमी कुलकर्णी यांना वैद्यकीय मदत न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.