Pune: खोली भाडेतत्त्वार न दिल्याने कोयत्याने तोडफोड; मावळ तालुक्यातील घटना

By नारायण बडगुजर | Updated: July 1, 2023 14:05 IST2023-07-01T14:05:48+5:302023-07-01T14:05:57+5:30

रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला...

Vandalism due to non-rental of rooms; Incidents in Maval Taluk | Pune: खोली भाडेतत्त्वार न दिल्याने कोयत्याने तोडफोड; मावळ तालुक्यातील घटना

Pune: खोली भाडेतत्त्वार न दिल्याने कोयत्याने तोडफोड; मावळ तालुक्यातील घटना

पिंपरी : खोली भाडेतत्वावर चालविण्यास न दिल्याचा राग मनात धरून इमारतीमधील आठ ते नऊ खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा, पाण्याच्या टक्या व सोलर सिस्टम कोयत्याचे साहाय्याने तोडफोड करून नुकसान केले. मावळ तालुक्यातील मौजे आंबी येथे गुरुवारी (दि. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

राजेंद्र प्यारालाल आर्या (वय ५५, रा. कामोठा, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम शांतीलाल चव्हाण (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांच्या मालकीची खोली भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली नाही. आरोपीने याचा राग मनात धरून त्याच्या मित्रासह फिर्यादीची खोली असलेल्या इमारतीत आला. तेथील आठ ते नऊ खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा व कमोड भांडे, वाॅश बेसीन भांडे, पाण्याच्या टाक्या, सोलर सिस्टम कोयत्याच्या साह्याने तोडफोड करून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Vandalism due to non-rental of rooms; Incidents in Maval Taluk