शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 08:53 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी दुपारी ही घटना घडली

पिंपरी : मृतदेह बदलल्याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात काम करणारे डाॅक्टर, कर्मचारी तसेच इतर काम करणारे संबंधित यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी ही घटना घडली.  रोहन अशोक गायकवाड (वय ३१, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन गायकवाड यांची आई स्नेहलता अशोक गायकवाड (वय ६१) या मयत झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच कायदेशीर काम न केल्याने मृतदेहांची बदलाबदली झाली. यात दुसऱ्याच मयत महिलेच्या नातेवाईकांना फिर्यादी रोहन यांच्या आईचा मृतदेह दिला. त्यांनी फिर्यादीच्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. संबंधित डाॅक्टरांचा व कर्मचारी यांचा हलगर्जीपणा व कायदेशीर काम न केल्याने फिर्यादीच्या आईच्या मृतदेहाची अवहेलना झाली, असे फिर्यादीत नमूद आहे.   ''मृतदेह बदली झाल्याबाबत चौकशी करण्यात येईल. मृतदेह ताब्यात घेणे व देणे या प्रक्रियेत पोलिसांनी हजर राहून शहानिशा करणे आवश्यक असते. मात्र, पोलीस हजर नव्हते. मृतदेह ताब्यात दिल्याबाबत नातेवाईकांकडून लेखी घेतले आहे. त्याबाबतची सर्व प्रक्रिया शवविच्छेदन गृहातील संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. - डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी'' 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू