शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 5:00 PM

मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचा प्रयत्न ३५० किलो निर्माल्य एकावेळी संकलित करण्याची या मशिनची क्षमता पिंपरी-चिंचवडमहापालिका हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे संकलनही मशीन समुद्रात चार किलोमीटरपर्यंतचा कचरा आणि निर्माल्य संकलित करू शकते.

मोशी : निर्माल्य संकलनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आणि इतर यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, पुरेशा जनजागृतीअभावी या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाहीत. परिणामी निर्माल्याची समस्या कायम आहे. यावर मात करण्यासाठी मानवरहित मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. थेट नदीपात्रातून या मशिनच्या साह्याने निर्माल्य संकलन करणे शक्य झाले आहे.  मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ३५० किलो निर्माल्य एकावेळी संकलित करण्याची या मशिनची क्षमता आहे. पिंपरी-चिंचवडमहापालिका हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे संकलन या मशिनच्या साह्याने करण्यात येत आहे. मशिन दोन मीटर लांब, १.७५ मीटर रुंद आणि ४५ सेंटीमीटर उंची असून ह्यवॉश शार्क मिशन सह एक आयताकृती बॉक्स आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक बास्केट आहे. ग्राउंड कंट्रोल स्टेशन नावाच्या सॉफ्टवेअरच्या साह्याने ही मशीन समुद्रात चार किलोमीटरपर्यंतचा कचरा आणि निर्माल्य संकलित करू शकते. मशिनच्या पृष्ठभागावर कोणत्याही स्वरूपात साडेतीनशे किलो फ्लोटिंग कचरा, निर्माल्य, प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करता येऊ शकतात. प्लॅस्टिक आणि इतर कचरा यासह हे मशिन पाणी आणि रासायनिक घटकांचेही विलगीकरण करते. पाण्यातील कीटक आणि वनस्पती या मशिनच्या साह्याने काढता येतात. मानवरहीत असलेली ही मशीन ड्रोनशी संवाद साधू शकते. या मशीनच्या माध्यमातून चिंचवड येथील गणेशमूर्ती विसर्जनावेळी सुमारे साडेतीनशे किलो निर्माल्य, कचरा संकलित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील नद्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या मानवरहित मशिनच्या माध्यमातून या नद्यांतील निर्माल्य आणि कचरा संकलनाचे काम सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवriverनदी