पवना धरणात सापडला अनोळखी मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 14:07 IST2019-03-17T13:47:57+5:302019-03-17T14:07:19+5:30
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शिंदगाव हद्दीमध्ये आज (दि.१७)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.

पवना धरणात सापडला अनोळखी मृतदेह
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शिंदगाव हद्दीमध्ये आज (दि.१७)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वयाचे असुन पुरुषाचा मृत्यू दोन ते तीन दिवसापुर्वी झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदगावाच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ हा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसुन आला.
नागरिकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्नशिमन दलाच्या सहाय्याने मुतदेह बाहेर काढण्यात आला. मुतदेह शवविच्छेदनासाठी जनरल हाँस्पिटल तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक लुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस नाईक जितेंद्र दिक्षीत, रहित मुलाणी,सुधिर घारे,याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.