मोशी येथील अपघातात दोन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:13 IST2018-07-04T20:12:36+5:302018-07-04T20:13:00+5:30

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. बुधवारी पहाटे महिलां प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. 

Unfortunate death of two women in accident at Moshi | मोशी येथील अपघातात दोन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू

मोशी येथील अपघातात दोन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू

मोशी : मोशी येथे बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दोन वारकरी महिलांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. अंबाजोगाई, जि. बीड) अशी मृत महिलांची नावे आहेत. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. याच दिंडीत जनाबाई आणि सुमनबाई आल्या होत्या. मोशी मधील बो-हाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. ३) रात्री ही दिंडी मुक्कामाला थांबली. बुधवारी पहाटे जनाबाई आणि सुमनबाई प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. 
या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.उपबाजार समिती चौकात रस्ता  ओलांडत असताना अज्ञात वाहनाने या भाविक महिलांना चिरडून निघून गेले. भोसरी पोलीस याबाबत तपास करत आहे.

Web Title: Unfortunate death of two women in accident at Moshi