शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अतिक्रमणविरोधी पथकाच्या नियुक्तीनंतरही वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 6:08 PM

सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव असतानाही काही व्यक्ती सामान्यांची दिशाभूल करून जागेची विक्री करीत आहे.

ठळक मुद्देप्राधिकरण प्रशासनाचे दुर्लक्षप्लॉटींग करून जागेच्या बेकायदा विक्रीतून सामान्यांची केली जातेय फसवणूक 

- नारायण बडगुजर-  पिंपरी : जागेची बेकायदा विक्री करून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे सर्रास सुरू आहे. अतिक्रमणांना तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्राधिकरणातर्फे पाच पथक नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. प्राधिकरण प्रशासनाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.  

वाल्हेकरवाडी येथे प्राधिकरण हद्दीत काही भागात अनधिकृत बांधकामे होत आहेत. सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव असतानाही काही व्यक्ती सामान्यांची दिशाभूल करून जागेची विक्री करीत आहे. अनधिकृतपणे येथे प्लॉटिंग केले जात आहे. तसेच बांधकाम आमच्याकडूनच करून घ्यावे, अशी सक्ती करण्यात येत आहे. बांधकाम अन्य ठेकेदाराकडून करून घ्यायचे ठरवल्यास रस्ता अडवून पिळवणूक केली जाते. यातून सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. या माध्यमातून प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होत असताना प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.     अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधात काही संस्था तसेच संघटनांकडून तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही. तसेच वाल्हेकरवाडीतील सर्व्हे क्रमांक ८६, ११३, १२१, १२२, १२३, १२४ व १२५ मधील पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या बांधकामांना प्राधिकरणाने परवानगी दिली आहे का, अशी माहिती एका माहिती अधिकार कार्यकत्यार्ने ४ एप्रिल २०१९ रोजी मागविली होती. त्याबाबत  ४ मे २०१९ रोजी प्राधिकरणाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार प्राधिकरणाने या बांधकामांना परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे...............तीन महिन्यांत ६९ अनधिकृत बांधकामांचा शोधअतिक्रमण व अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्राधिकरणातर्फे ४२ पेठांमध्ये पाच झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच शाखा अभियंता, मजूर व पोलीस कर्मचारी यांचा सहभाग असलेले पथक नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक झोनसाठी एक याप्रमाणे पाच पथके आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या झोनमध्ये दररोज पाहणी करण्यात येते. जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत या पथकांना केवळ ६९ अनधिकृत बांधकामे आढळून आली. अशा बांधकामांचे छायाचित्र काढून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस दिली जाते.  ...................................अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ४२ पेठांसाठी पाच पथके नियुक्त केली आहेत. प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. वाल्हेकरवाडीतही अशा पध्दतीने नोटीस बजावल्या जात आहेत. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल..    - सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास, प्राधिकरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEnchroachmentअतिक्रमणnigdiनिगडी