'टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात', उदय सामंतांचा राणेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:47 IST2022-02-17T17:46:46+5:302022-02-17T17:47:15+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे.

'टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात', उदय सामंतांचा राणेंना टोला
पिंपरी-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे. "जे टीका करतात ते त्यांच्या कर्माचे. मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीकाही करत नाही. टीका करणाऱ्यांना मी उत्तरही देत नाही. टीका करत जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात", असं टोला उदय सामत यांनी राणेंचं नाव न घेता लगावला आहे. पिंपरी येथे आयपीएस कॅम्पसमध्ये आजोयित कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी विद्यापीठास निधी मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. ४८ तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यासन केंद्रास ३ कोटी निधी देण्याचा ठराव मंत्री मंडळात मंजुर करण्यात आला, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. नारायण राणेंवर टीका करताना उदय सामंत यांनी माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येऊन दाखवा असं खुलं आव्हान देखील उदय सामंत यांनी दिलं.