वाहनचोरास पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी पोलिसांशी दोन तरुणींची हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:49 IST2021-01-09T15:48:50+5:302021-01-09T15:49:08+5:30
संशयित वाहनचोराला पकडण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी तरुणींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली.

वाहनचोरास पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी पोलिसांशी दोन तरुणींची हुज्जत
पिंपरी : एका संशयिताने वाहनचोरून नेल्याबाबत नियंत्रण कक्षाकडून पिंपरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार बिटमार्शल संशयित वाहन चोराला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी दोन तरुणींनी त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा केला. नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली.
सोनम कल्याणसिंग चव्हाण (वय २५, रा. नेहरूनगर, पिंपरी) हिच्यासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सुरेश सोलवणे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलिसांनापिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षातून फोन आला. नेहरूनगर येथे एका व्यक्तीने मदतीसाठी फोन केला होता. त्यानुसार फिर्यादी पोलीस कर्मचारी सोलवणे आणि त्यांचे सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका व्यक्तीने वाहन चोरले आहे, असे नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार संशयित वाहनचोराला पकडण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी तरुणींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली.