दोन महिलांच्या 97 हजारांच्या सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 17:58 IST2019-12-18T17:56:59+5:302019-12-18T17:58:36+5:30

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलांच्या सोनसाखळी चोरून नेल्या...

Two women 97 thousand gold chains theft | दोन महिलांच्या 97 हजारांच्या सोनसाखळी लंपास

दोन महिलांच्या 97 हजारांच्या सोनसाखळी लंपास

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलांच्या सोनसाखळी चोरून नेल्या. एकूण ९७ हजारांचा ऐवज लंपास केला. पिंपळे गुरव येथील जवकळकर नगरमध्ये सोमवारी (दि. १६ ) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही जबरी चोरी झाली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शुभांगी मयूर भावसार (वय 33, रा. महाराष्ट्र कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी शुभांगी भावसार जवळकरनगर येथे पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम 300 मिली वजनाची 35 हजार रपयांची सोनसाखळी हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेली. तसेच ज्योती भिडे (रा. पिंपळे सौदागर) यांच्या गळ्यातील 33 ग्रॅम वजनाची 62 हजारांची सोनसाखळी या चोरट्यांनी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Two women 97 thousand gold chains theft