शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी भीषण आगीत खाक; सांगवीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:38 IST

आगीने राैद्र रुप धारण केल्याने कारवाईत जप्त केलेल्या ३० ते ३५ दुचाकी खाक

पिंपळे गुरव : पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या ३० ते ३५ दुचाकी अचानक लागलेल्या आगीत खाक झाल्या. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानातील इमारतीलगत रस्त्याच्या कडेला सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडी मैदानातील इमारतीलगत रस्त्याच्या कडेला दुचाकी होत्या. सांगवी पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या होत्या. या दुचाकींना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी लागलीच महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविले. त्यानंतर पिंपरीतील संत तुमाराम नगर येथील व ड क्षेत्रीय कार्यालयाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीने राैद्र रुप धारण केल्याने सर्व दुचाकी खाक झाल्या. दोन्ही बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशामक दलाचे सोमनाथ तुकदेव, विठ्ठल घुसे, लक्ष्मण होवाळे, सुशीलकुमार राणे, मंगेश देवगडकर, वाहन चालक शांताराम काटे आदींनी आग आटोक्यात आणली.

टॅग्स :SangviसांगवीfireआगFire Brigadeअग्निशमन दलtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस