पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:16 PM2019-07-24T20:16:03+5:302019-07-24T20:17:16+5:30

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

two wheeler rider injured in collision with pmpml | पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

googlenewsNext

थेरगाव : पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. थेरगावच्या डांगे चौकातील बीआरटी मार्गात बुधवारी हा अपघात झाला. जखमी दुचाकीस्वाराला  उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल उत्तम गंजे (वय २४, रा. एकता कॉलनी, गणेश नगर,  थेरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. पीएमपीच्या कोथरूड आगाराची बस डांगे चौकातील बीआरटी मार्गातून चिंचवडच्या दिशेला जात होती. त्यावेळी अमोल गंजे त्यांच्या दुचाकीने वाकड रस्त्यावरून औंधच्या दिशेला जात होते. त्यावेळी गंजे यांच्या पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार अमोल गंजे यांच्या पायाला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: two wheeler rider injured in collision with pmpml

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.