पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 20:17 IST2019-07-24T20:16:03+5:302019-07-24T20:17:16+5:30
पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
थेरगाव : पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. थेरगावच्या डांगे चौकातील बीआरटी मार्गात बुधवारी हा अपघात झाला. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल उत्तम गंजे (वय २४, रा. एकता कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. पीएमपीच्या कोथरूड आगाराची बस डांगे चौकातील बीआरटी मार्गातून चिंचवडच्या दिशेला जात होती. त्यावेळी अमोल गंजे त्यांच्या दुचाकीने वाकड रस्त्यावरून औंधच्या दिशेला जात होते. त्यावेळी गंजे यांच्या पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार अमोल गंजे यांच्या पायाला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.