ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 15:15 IST2020-01-01T15:15:33+5:302020-01-01T15:15:44+5:30
वाघेश्वर कॉलनी येथे भरधाव ट्रॅक्टरने अजित यांच्या दुचाकीला दिली धडक

ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जुना जकात नाका ते जाधववाडी रस्त्यावर घडली.
अजित इंद्रजित गुजर (वय ६२, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अमर अजित गुजर (वय ३१) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित त्यांच्या दुचाकीवरून जुना जकात नाका ते जाधववाडी या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी वाघेश्वर कॉलनी येथे भरधाव ट्रॅक्टरने अजित यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.