पिंपरी चिंचवड :चऱ्होलीत दोन दुचाकी आणि टेम्पो यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. आणि तसेच एक विद्यार्थी जखमी जण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चऱ्होली फाट्याजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रावसाहेब काळे( वय-३८ ) व किरण सुरेश सावंत (वय-३२ )अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. संकेत पिल्ले हा जखमी झाला असून तो एमआयटीचा विद्यार्थी आहे.त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी दहाच्या सुमारास टेम्पो आळंदीच्या दिशेने जात होता,मयत काळे आणि सावंत दोघे एका दुचाकीवर होते. ते टेम्पोला ओव्हरटेक करून डावीकडून पुढे जात होते. तेवढ्यात संकेत पिल्ले हा समोर विरुद्ध दिशेने आला त्याने टेम्पोला धडक दिली. त्यामुळे डावीकडून पुढे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघे जण टेम्पोच्या मागील चाकाखाली आले.त्यांचा जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.पिल्लेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चऱ्होलीत दुचाकी आणि टेम्पोचा अपघात; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:42 IST
चऱ्होलीत दोन दुचाकी आणि टेम्पो यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात झाला. हा अपघात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चऱ्होली फाट्याजवळ घडला.
चऱ्होलीत दुचाकी आणि टेम्पोचा अपघात; दोन ठार
ठळक मुद्दे संकेत पिल्ले हा एमआयटीचा विद्यार्थी जखमी