यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:49 IST2019-11-08T19:48:52+5:302019-11-08T19:49:06+5:30
बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला..

यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास
पिंपरी : यमुनानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदिचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख २४ हजार ४४९ रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय ६९, रा. सेक्टर नंबर २१, यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र यांचे घर ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून २ लाख २४ हजार ४४९ रुपये किमतीचे सोन्या-चांदिचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. रामचंद्र गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.