हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 15:32 IST2019-07-14T15:31:21+5:302019-07-14T15:32:20+5:30
दुचाकी चाेरीच्या दाेन घटना पिंपरी चिंचवडमध्ये समाेर आल्या आहेत.

हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या
पिंपरी : पेट्रोल पंप आणि दुकानासमोरून दुचाकी चोरून नेण्याच्या दोन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल अच्युतराव गिरी (वय २६, रा. अमर भारत सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बावधन येथील एनडीए पाषाण रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपाजवळ विठ्ठल गिरी यांनी त्यांची दुचाकी (एम एच १२ जेएच ४३५३) लावून ते लघुशंकेसाठी रस्त्याचा कडेला गेले. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, कांतीलाल नारायण लोंढे ( वय ४२, रा. साठेनगर, कावेरीनगर पोलीस लाईनजवळ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवार (दि. ०८) रात्री साडे बारा वाजल्याच्या सुमारास त्यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १४ जीई ४७०७) काळेवाडी येथील तापकीरनगर रस्त्यावरील भारत ट्रेडर्स दुकानासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.