थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 14:44 IST2021-05-22T14:43:37+5:302021-05-22T14:44:55+5:30

आरोपी हे चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Two arrested in gutka transport case in thergaon ; 5 lakh 27 thousand items confiscated | थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७७ हजार ७८१ रुपयांचा गुटखा व चार लाख ५० हजार रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन, असा एकूण पाच लाख २७ हजार ७८१ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाकड पोलिसांनी थेरगाव येथे शुक्रवारी (दि. २१) ही कारवाई केली.

सवईराम कोजारामजी देवाशी (वय २६, रा. शिरगाव), प्रकाश गोपाराम देवाशी (वय २४, रा. रावेत), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुटखा व एक चारचाकी वाहन जप्त केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Two arrested in gutka transport case in thergaon ; 5 lakh 27 thousand items confiscated