शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू

By प्रकाश गायकर | Updated: December 18, 2023 20:11 IST

अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता

पिंपरी : अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे शहरातील हजारो बालके आणि स्तनदा मातांना पोषण आहाराला मुकावे लागत आहे. शहरातील ३६१ केंद्रापैकी फक्त ६ अंगणाड्या सुरू आहेत. त्यामुळे स्तनदा माता व चिमुकल्यांना पोषण आहार मिळत नाही. हा संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.   राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाकडून अंगणवाडी केंद्रात पोषक आहार दिला जातो. मात्र, अंगणवाडी सेविका ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांना नियमित पोषण आहार मिळालेला नाही. शहरात ३६१ पेक्षा अधिक अंगणवाड्या असून यामध्ये सुमारे २० हजार बालके आहेत. ही बालके प्रामुख्याने गरीब घरातील आहेत. संप काळात या बालकांना पोषण आहार पुरविण्याबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत. तीन ते ६ वयोगटातील बालकांना नियमित पोषण आहारसोबतच संस्काराचे धडे दिले जातात. त्यांना अक्षरओळख करून दिली जाते. तसेच मनोरंजनात्मक गीते व कविता शिकवल्या जातात. त्यामुळे चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. मात्र, अंगणवाड्यांना टाळे लागल्याने चिमुकल्यांची गैरसोय झाली आहे. 

आहारामध्ये या पदार्थांचा समावेश 

दररोजच्या वेळापत्रकानुसार लापशी, खिचडी, उसळ, वरण-भात, पुलाव आणि उपीट असा गरम व ताजा आहार दिला जातो. मात्र, सध्याच्या संपामुळे झोपडपट्टी भागातील बालकांना हा आहार मिळत नाही. 

कुपोषित बालकांमध्ये वाढ होण्याची शक्यता 

शहरामध्ये कामा-धंद्यांच्या निमित्ताने गरीब कुटुंबे स्थायिक झाली आहेत. तसेच गरोदर माता, स्तनदा माता व नवीन वर्षांच्या आतील कुपोषित बालकांना घरपोच पौष्टिक आहार दिला जातो. मात्र, हा आहार बंद झाल्याने कुपोषित बालकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. लवकरच तोडगा काढल्यावर प्रश्‍न सुटू शकेल. सध्या आहार बनविणे बंद आहे. - प्रशांत राऊत, कनिष्ठ सहाय्यक, अंगणवाडी प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीWomenमहिलाSocialसामाजिकagitationआंदोलन