शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नगर वसाहतीत आग लागून वीस गाड्या जळून खाक; आगीच्या कारणाचा पोलीस घेतायेत शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 12:49 IST

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ४ होजच्या ३ लाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळवले

पिंपरी: नेहरूनगर परिसरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम लगत असणाऱ्या विठ्ठलनगर वसाहतीत रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास वीस वाहने जळून खाक झाले आहेत. कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. गाड्या जळाल्या की जाळल्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणेदोन च्या सुमारास लागले ची माहिती अग्निशामक दलास मिळाली. सोसायटीचे चेअरमन राजू कुऱ्हाडे यांनी अग्निशामक दलास आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

पिंपरी चिंचवड मनपा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता आग मोठ्या प्रमाणात असल्याने भोसरी चिखली व मोशी उप अग्निशमन केंद्र येथील गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ४ होजच्या ३ लाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. धुराचे प्रमाण जास्त असल्याकारणाने वरच्या मजल्यावर असलेल्या घरांमध्ये जाऊन धुरामध्ये कोणी अडकले नाही.  याची खात्री केली. या ठिकाणी अंदाजे २० वाहने जळाल्याचे निदर्शनास आले. आगीचे कारण समजू शकले नाही. ही आग विझवण्यासाठी  विनायक नाळे, लीडिंग फायरमन विकास नाईक, फायरमन अमोल चिपळूणकर,  अर्जुन जाधव, विकास कुटे, अभिषेक भांगे, संकेत शिंदे  या पथकाने आग आटोक्यात आणली.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलSocialसामाजिकWaterपाणी