शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

ट्रॉली उलटली, वृद्धा जखमी; चिंचवड स्टेशन येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:01 AM

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऊस वाहून नेणाºया ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या ट्रॉलीतील उसाचा ढीग अंगावर पडून झालेल्या अपघातात वृद्धा जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर घडली. सुमन कांबळे (वय ६०, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी महिलेचे नाव आहे.

पिंपरी : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऊस वाहून नेणाºया ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या ट्रॉलीतील उसाचा ढीग अंगावर पडून झालेल्या अपघातात वृद्धा जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर घडली. सुमन कांबळे (वय ६०, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन चौकातून पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावरून उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर (एमएच १४ डीजे १८३) जात होता. चालकाचे नियंत्रण सुटून उसाने भरलेली ट्रॅक्टरची पहिली ट्रॉली उलटली. त्या वेळी तेथून जाणाºया सुमन कांबळे यांच्या अंगावर उसाचा ढीग पडला. त्यात त्या जखमी झाल्या. तेथील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. कांबळे यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाली असून, त्यांच्या कानातूनही रक्त आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सुमन कांबळे यांनी माझ्यासोबत दोन मुले होती, असे सांगितले.- पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उसाचा ढिगारा बाजूला केला. मात्र, ढिगाºयाखाली कोणी आढळून आले नाही. मुले तेथून बाजूला झाल्याचे लक्षात आले. या अपघातामुळे एका टेम्पोचेही नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला काढण्यात आल्यानंतर ती सुरळीत झाली.पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

टॅग्स :Accidentअपघात