लोणावळा बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 00:53 IST2019-02-20T00:52:36+5:302019-02-20T00:53:11+5:30

हल्ल्याचा निषेध व शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हा बंद पुकारण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला

Tribute to the soldiers by keeping Lonavla closed | लोणावळा बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली

लोणावळा बंद ठेवून जवानांना श्रद्धांजली

लोणावळा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली म्हणून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लोणावळा बंदला बाजारपेठा व व्यवहार कडकडीत बंद ठेवत पाठिंबा देण्यात आला.

हल्ल्याचा निषेध व शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हा बंद पुकारण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकत्र येत बंदला पाठिंबा दिला. तसेच भारत सरकारने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना नेस्तनाबूत कराव्यात, अशी मागणी केली. रेल्वे स्थानकाबाहेर साईबाबा रिक्षा संघटनेच्या वतीने पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदवत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी रेल्वे पोलीस फोर्सचे पोलीस निरीक्षक गजेंद्रसिंह परिहार, पोलीस उपनिरीक्षक तोताराम मीना, राजकुमार यादव, गणेश साळुंके यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 

Web Title: Tribute to the soldiers by keeping Lonavla closed