मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 17:05 IST2021-06-05T17:05:22+5:302021-06-05T17:05:39+5:30

मावळ परिसरात अनेक बॉलिवूड स्टार्सचे बंगले आहेत.

Tree planting campaign by actress Sangeeta Bijlani in Tikona | मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम

मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम

पवनानगर :पवना, मा‌वळ परिसरातील निसर्गसौंदर्य नेहमीच सिनेसृष्ट्रीतील अभिनेत्यांना भुरळ घातलेली पाहायला मिळत असते. याठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्सचे बंगले आहेत. तिकोना येथे आपल्या घरी विकेंडचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी आल्या होत्या. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. आणि त्यांनी या संधीचा फायदा घेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. 

मावळ तालुक्यातील ठाकुरसाई, तिकोना या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. वनविभागाच्या मोकळ्या जागेवर जवळपास ४०० वृक्षारोपण करण्यात आले  यामध्ये साग, पिंपळ वड, बांबू,चिंच,आवळा,करंज यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.तिकोना येथे आपल्या घरी विकेंडचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी आल्या असताना त्यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम राबवत ग्रामस्थांनी पर्यावरण दिनानिमित्त सकारात्मक संदेश दिला. 

पर्यावरणाचा बिघडणारा समतोल सावरण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन आवश्यक असून युवकांनी यात मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेणे गरजेचे आहे ", असे मत ठाकुरसाई खडक गेंव्हडे ग्रामपंचायत चे सरपंच नारायण बोडके यांनी व्यक्त केले. 

यावेळी सरपंच नारायण बोडके, धर्मेंद्र ठाकर, तिकोणाचे उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ, माजी सरपंच अनंता वर्वे, वनसमिती अध्यक्ष राम मोहोळ, आंनता खैरे, प्रकाश ठाकर, रवि ठाकर, वनपाल वाय. यु. जाधव, वनरक्षक एम .एम . शिरसाठ यांच्या उपस्थितीत होते.

Web Title: Tree planting campaign by actress Sangeeta Bijlani in Tikona