तृतीयपंथीयांनी वाहनचालकाला मारहाण करून लुटले; पुणे- मुंबई महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:51 IST2021-06-07T22:50:27+5:302021-06-07T22:51:46+5:30
फिर्यादी हे चारचाकी वाहनातून तळेगावकडून भोसरीकडे जात असताना घडली घटना, 3 जणांना अटक

तृतीयपंथीयांनी वाहनचालकाला मारहाण करून लुटले; पुणे- मुंबई महामार्गावरील घटना
पिंपरी : चारचाकी वाहनचालकाला तीन तृतीयपंथीयांनी मारहाण करून लुटले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गाने तळेगावकडून भोसरीकडे जात असताना एकरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीमध्ये शनिवारी (दि. ४) ही घटना घडली.
बालिका आबादास भोगे (वय ३३), दिया बाबूराव शर्मा (वय २७), राहुल कैलास गायकवाड (वय २२, सर्व रा. पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रुबेन विल्यम ओहोळ (वय ४५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चारचाकी वाहनातून तळेगावकडून भोसरीकडे जात होते. त्यावेळी एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीत आरोपींनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर फिर्यादीला हाताने मारहाण करून त्यांच्याकडील पाचशे रुपये रोख रक्कम आणि ३५ हजारांचा सोन्याचा गोफ, असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.