लोणावळा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 08:54 IST2018-03-25T08:47:11+5:302018-03-25T08:54:47+5:30

गाडी यू टर्न करण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन पोलिसांच्या सोबत हुज्जत घालत वाहतूक पोलिस व वाॅर्डन यांना मारहाण केल्याचा प्रकार गवळीवाडा चौकात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

The traffic police beat up at Lonavla Chowk | लोणावळा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण   

लोणावळा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण   

लोणावळा - गाडी यू टर्न करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून पोलिसांसोबत हुज्जत घालत वाहतूक पोलिस व वाॅर्डन यांना मारहाण केल्याचा प्रकार गवळीवाडा चौकात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       शनिवारी सुट्टयांमुळे लोणावळ्यात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच कार्ला गडावर एकवीरा देवीचा पालखी सोहळा पाहण्याकरिता कोकण भागातील भाविकांची रांग लागल्याने लोणावळ्यात दिवसभर वाहतूक कोंडी होती. सायंकाळच्या सुमारास गवळीवाडा येथिल मिनू गॅरेज चौकात नो यु टर्नच्या जागी एक कार चालक टर्न घेत होता. चौकातील वाहतूक पोलिस सी.एफ.गव्हाणे याने त्याला यू टर्न न घेता गाडी पुढे घेऊन जाण्याची सूचना केली असता. गाडी पुढे न घेता त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सोबत हुज्जत घालण्यास व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी गाडीतून उतरलेले अक्षय गावडे, साईनाथ पाटील व दया पाटील ( सर्व राहणार ठाणे, मुंबई) यांनी वाहतूक पोलीस गव्हाणे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी आलेले वाॅर्डन मारुती आंबेकर याला देखील मारहाण झाली. हा सर्व प्रकार नागरिक मात्र हाताच्या घड्या घालून पहात होते. घटनेची माहिती समजताच गवळीवाडा चौकात आलेल्या लोणावळा पोलीसांनी पोलिसांना मारहाण केलेल्या तीनही जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रक‍ांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Web Title: The traffic police beat up at Lonavla Chowk