दिवाळीची सुट्टी संपवून परत निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक काेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 20:43 IST2018-11-11T20:41:20+5:302018-11-11T20:43:18+5:30

दिवाळीची सुट्टी संपवून मुंबई- पुण्याकडे निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतुक काेंडी झाली हाेती.

traffic jam on mumbai-pune express way | दिवाळीची सुट्टी संपवून परत निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक काेंडी

दिवाळीची सुट्टी संपवून परत निघालेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक काेंडी

लोणावळा : दिवाळीची सुट्टी संपवून परत फिरलेल्या पर्यटकांच्या गर्दीने आज सायंकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा वेग मंदावल्याचे चित्र घाट परिसरात पहायला मिळाले.  मुंबई व पुणे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
      
   दिवाळी सुट्टीला जोडून शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने या सुट्टयांचा आनंद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापुर, पंढरपुर, तुळजापुर भागात तसेच कोकण भागातील विविध समुद्र किनार्‍यांवर गेले होते. हे सर्व पर्यटक आज सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असल्याने घाट भागातील दोन्ही मार्गीकावर वाहतुक कोंडी झाली होती.

Web Title: traffic jam on mumbai-pune express way