तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 20:11 IST2019-05-31T20:09:10+5:302019-05-31T20:11:21+5:30
तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील बापुजीबुवा चौक येथे घडली.

तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील बापुजीबुवा चौक येथे घडली.
अमोल जानकर (वय २७, रा. आदिनाथनगर, भोसरी) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अक्षय बाळू कंद (वय २६, रा. गव्हाणे तालीमशेजारी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी कंद हे बापुजीबुवा चौक येथे असताना आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.