दोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:10 IST2018-10-23T19:09:23+5:302018-10-23T19:10:45+5:30
गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

दोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद
पिंपरी : खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना भोसरीपोलिसांच्या ताब्यात दिले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर शाम माने (वय २०,गणेशनगर, भोसरी), लक्ष्मण नामदेव माने (वय २४), सोमनाथ नागनाथ माने (रा.उरूळी देवाची) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे,धमकाविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलीस त्यांचा शोध घेत होते. दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे तिन्ही आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे हे गस्तीवर असताना, त्यांना आरोपी भोसरी एमआयडीसी परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन,अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे,सहायक पोलीस आयुकत सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक तांगडे,युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, तसेच पोलीस हवालदार अजय भोसले, पोलीस नाईक सावन राठोड,निशिकांत काळे,पोलीस शिपाई प्रमोद हिरळकर, सागर शेंडगे, गणेश कोकणे,विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.