चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:14 IST2019-08-05T21:13:01+5:302019-08-05T21:14:58+5:30

मोबाइलवरून एसएमएस पाठवून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मुलीला पळवून नेऊन तिला व पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 

Threat worn to kill wife to take doubt on character | चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकी

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : मोबाइलवरून एसएमएस पाठवून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मुलीला पळवून नेऊन तिला व पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 

पिंपरी येथे शनिवारी (दि. ३) दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी पीडित महिला व आरोपी पतीपत्नी आहेत. आरोपीने फिर्यादी पीडित महिलेचा शनिवारी पाठलाग केला. तसेच मोबाइलवरून एसएमएस पाठवून चारित्र्यावर संशय घेतला. महिलेच्या वडिलांचे काळेवाडी येथे दुकान आहे. पेट्रोल टाकून हे दुकान जाळून टाकीन व मुलीला पळवून नेऊन तिला व पीडित महिलेला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

Web Title: Threat worn to kill wife to take doubt on character