शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला कामावर येण्यास प्रतिबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:01 IST

हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

हिंजवडी : अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीला गेल्याप्रकरणी अखेर अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसाला अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या. मुळशीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकाऱ्यांनी याबाबत प्राथमिक निर्णय घेतल्याचे समजते.

बुधवारी (दि. २६) हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने, लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते. त्यांनी तत्काळ सेविकेली संपर्क केला, मात्र प्रतिसाद न भेटल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसाला अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. पूर्ण चौकशी करून अहवाल मागितला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर त्यांच्यावर लेखी स्वरूपात कारवाई करण्यात येईल.  - धनराज गिराम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अधिकारी मुळशी.

English
हिंदी सारांश
Web Title : Hinjewadi: Anganwadi Workers Barred After Locking Children In, Negligence Alleged

Web Summary : Hinjewadi anganwadi workers face action after locking children during a meeting. Parents protested, prompting an investigation. Authorities have barred the workers, assigning additional duties to others. A full inquiry is underway.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड