गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 21:14 IST2019-09-02T21:14:09+5:302019-09-02T21:14:40+5:30

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे.

Thieves take advantage of the crowd to loot mobiles | गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

पिंपरी : गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे. पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजाराच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. 

मोबाईलचोरीचा पहिला प्रकार पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी मोहन लक्ष्मणराव देशपांडे (वय ५०, रा.  लिंक रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन देशपांडे हे रविवारी (दि. १) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरीतील फुल मार्केट येथे गेले होते. तेथे अज्ञात चोरट्यांनी त्यांचा सुमारे १७ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरट्यांनी चोरून नेला. याचा पिंपरी पोलीस तपास करत आहेत. 

मोबाइल चोरीचा दुसरा प्रकार चिंचवडमधील भाजी मंडई येथे घडला आहे. याप्रकरणी कौस्तुभमणी श्रीवत्सलांचन कट्टी (वय ४१, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कौस्तुभमणी कट्टी रविवारी (दि. १) दुपारी चिंचवड भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांना सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरून नेला.

Web Title: Thieves take advantage of the crowd to loot mobiles