पिंपरीत चोरट्यांकडून आता महागड्या दुचाकी टार्गेट;वाहनधारक धास्तावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:59 IST2021-01-28T16:58:59+5:302021-01-28T16:59:20+5:30

चोरट्यांची पळविल्या चार दुचाकी

Thieves in Pimpri now target expensive two-wheelers | पिंपरीत चोरट्यांकडून आता महागड्या दुचाकी टार्गेट;वाहनधारक धास्तावले 

पिंपरीत चोरट्यांकडून आता महागड्या दुचाकी टार्गेट;वाहनधारक धास्तावले 

पिंपरी : वाहनचोरीच प्रकार सर्रास सुरूच आहेत. यात महागड्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. शहरातून चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. २७) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सारंग नितीन मटंगे (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची एक लाख १० हजारांची दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. मंगळवारी (दि. २६) सकाळी दहाच्या सुमारास वाहनचोरीचा प्रकार उघडकीस आला. 

मंदा सुरेश शिंदे (वय ४०, रा. राणूबाई मळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची २० हजारांची दुचाकी १३ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. ही घटना १४ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
 

Web Title: Thieves in Pimpri now target expensive two-wheelers