Pimpri Chinchwad: चोरटा बाल्कनीतून पडला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला
By रोशन मोरे | Updated: August 9, 2023 16:52 IST2023-08-09T16:51:00+5:302023-08-09T16:52:31+5:30
ही घटना ही घटना मंगळवारी (दि.८) अडीचच्या सुमारास गणराज कॉलने नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.

प्रतिकात्मक फोटो
पिंपरी : चोरटा घरात शिरला. महिलेला धमकावून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. मात्र, पळून जाताना चोरटा बाल्कनीतून पडला आणि थेट पोलिसांच्या तावडीत सापडला. ही घटना ही घटना मंगळवारी (दि.८) अडीचच्या सुमारास गणराज कॉलने नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. या प्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव पंकज दिलीप पवार (वय ३२, रा.चिंचवड) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पहिल्या मजल्यावर असलेल्या घराची कडी आतून बंद होती. मात्र, चोरटा बाल्कनीत आला तेथून त्याने खिडकीतून हात घालून कडी उघडली. घरात प्रवेश करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील १२ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. पळून जात असताना चोरटा बाल्कनीतून उडी मारताना खाली पडला. नागरिकांना हे लक्षात येताच त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.