शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: ‘थेरगाव क्वीन’चा साथीदार ‘भाई’ अटकेत; म्हणाला, असे व्हिडिओ परत नाही करणार ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:27 IST

अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा व्हिडिओ व्हायरल करणारा या ‘भाई’ने गयावया करत माफी मागितली

पिंपरी : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’च्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या. अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा व्हिडिओ व्हायरल करणारा या ‘भाई’ने गयावया करत माफी मागितली. असे व्हिडिओ परत करणार नाही, असेही तो म्हणाला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.   कुणाल राजू कांबळे (वय २६, रा. नाडे गल्ली, गणेशपेठ, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन तरुणींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेली थेरगाव येथील तरुणी ही इन्स्टग्राम या मोबाईल अ‍ॅप्सवर ‘थेरगाव क्वीन’ नावाचे अकाउंट चालवते. या तरुणीने आरोपी कुणाल कांबळे आणि आरोपी तरुणीसोबत व्हिडिओ तयार करून व्हायरल केले. या व्हिडिओमध्ये धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजातील मुला-मुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत होत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘थेरगाव क्वीन’ हे अकाउंट चालविणाऱ्या तरुणीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यातील आरोपी कुणाल कांबळे याच्या मागावर पोलीस होते. आरोपी कुणाल हा जंगली महाराज रोड, चौपाटी, शिवाजीनगर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पाेलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, स्वप्नील खेतले, दत्तात्रय गोरे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, जालिंदर गारे, सचिन गोनटे, मारुती करचुंडे, राजेकश कोकाटे, गणेश कारोटे, दीपक शिरसाट, अतुल लोखंडे, सुमित डमाळ, योगेश तिडके, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेशमा झावरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

झिंग उतरली, भाषा नरमली

‘थेरगाव क्वीन’ या अकाउंटवरून धमकीवजा, अश्लील भाषेचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा आरोपींनी धडाका लावला होता. त्यामुळे सोशल मीडियाचा वापरकर्त्यांना त्याचा नाहक त्रास होत असे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या हिसक्यानंतर आरोपींची ‘आभासी दुनियेची’ झिंग उतरली आणि त्यांची भाषाही नरमली. पोलिसांच्या या कारवाईचे सोशल मीडियातूनही कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSocial Mediaसोशल मीडिया