शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोयत्याचा धाक दाखवून चोरी; वाहनांची तोडफोड; चिंचवडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 4:46 PM

रविवारी रात्री आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले..

पिंपरी : चिंचवडमधील  पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत एकाच्या खिशातील रोकड    चोरल्याची घटना घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत कोयत्याचा

धाक दाखवून वडिलांच्या खिशातून ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी रिक्षाची तोडफोड केली. आरोपींनी हवेत कोयते फिरवत दहशत पसरवून निघून गेले. फिर्यादी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना लिंक रोडवरील पुलाखाली एक लाल रंगाच्या कारची देखील तोडफोड झाल्याचे दिसले. त्या कारचीही आरोपींनी तोडफोड केल्याचे फिर्यादी यांना समजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

किरण पवार, अविनाश साळवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित ऊर्फ जाड्या साळवे (सर्व रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोमल बाबू खैरारिया (वय २४, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस