भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:25 IST2025-02-12T09:24:17+5:302025-02-12T09:25:54+5:30

वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात होणार साकार : ट्रस्टची माहिती

The temple of Saint Tukoba on Bhandara hill will be dedicated within a year | भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण

भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण

पिंपरी : जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या वर्षभरात लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे गजानन शेलार यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर ज्यांच्या स्थापत्यकलेतून उभारले गेले, ते चंद्रकांत सोमपुरा, निखिल सोमपुरा बंधू स्थापत्यविशारद म्हणून येथे कार्यरत आहेत. मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेश सोमपुरा या पिता-पुत्रांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

गांधीनगर (गुजरात) येथील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे. मंदिराची लांबी १७९ फूट, उंची ८७ फूट व रुंदी १९३ फूट असून, मंदिराला तीन भव्य कळस आहेत. मंदिराचा घुमट ३४ फूट बाय ३४ फूट असून, १३.५ बाय १३.५ फूट आकाराची एकूण ५ गर्भग्रहे मंदिरात असतील. मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल -रुख्मिणीची मूर्ती व भक्तीमध्ये दंग झालेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Web Title: The temple of Saint Tukoba on Bhandara hill will be dedicated within a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.