पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; दोन महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:57 IST2022-07-14T14:56:43+5:302022-07-14T14:57:37+5:30
रावेत येथील लॉजवर कारवाई...

पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; दोन महिलांची सुटका
पिंपरी : वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच एकाला अटक केली. वैभव लाॅज, पुणे-मुंबई महामार्ग, किवळे, रावेत येथे बुधवारी (दि. १३) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मोहम्मद बाशा शेख (वय ४५, रा. एमबी कॅम्प, देहूरोड), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील वैभव लाॅज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेलया रकमेतून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत दोन हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.