पोलिसाला कारने तब्बल ८०० मीटर फरपटत नेले; निगडीतील खंडोबामाळ चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 18:34 IST2022-08-27T18:29:32+5:302022-08-27T18:34:59+5:30
पोलिसाला कारचालकाने तब्बल ८०० मीटर पर्यंत फरपटत नेले...

पोलिसाला कारने तब्बल ८०० मीटर फरपटत नेले; निगडीतील खंडोबामाळ चौकातील घटना
पिंपरी : विना नंबरची कार आडवणाऱ्या पोलिसाला कारचालकाने तब्बल ८०० मीटर पर्यंत फरपटत नेले. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी ५.३० च्या सुमारास निगडीतील खंडोबामाळ चौकात घडली. या प्रकरणी पोलिस नाईक देवराम पारधी (वय ३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपी भरत तुकाराम जैद (वय २८, रा.चिंबळी फाटा, खेड) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडोबामाळ चौकात वाहतुक नियमन करत होते. तेंव्हा त्यांना थरमॅक्स चौकातून येणारी एक पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसणारी गाडी दिसून आली.
फिर्यादींनी गाडी चालकाला हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, गाडी चालकाने थेट गाडी फिर्यादींच्या अंगावर घातली. फिर्यादी गाडीच्या बोनेटवर पडले असता आरोपीने त्यांना तब्बल ८०० मीटर पर्यंत फरपटत नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.