शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषपणाचा कळस...! आवारे निपचित पडल्यांनंतरही करत होते वार, मावळात संतापाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:58 IST

गुन्हेगारांना कशाचीही भीती न राहिल्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून त्या हल्लेखोरांना अटक करून कडक शिक्षा करावे, मावळातील नागरिकांची मागणी

पिंपरी: मावळ तालुक्यातील युवा नेते आणि उद्योजक किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपालिका कार्यालय समोर शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गोळीबार करत तसेच कोयत्याने डोक्यावर वार केले. निपचीत पडल्यानंतरही हल्लेखोर आवारे यांच्यावर वार करत होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळ परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मावळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादामध्ये खून आणले होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव मध्ये निघृणपणे हत्या करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी सोमाटणे फाटा येथे एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती. 

शुक्रवारी दुपारी नगरपालिका आवारामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार जणांनी येऊन आवरे यांच्यावर गोळीबार केला तसेच ते जमिनीवर धारातीर्थी पडल्यानंतर शरीर निपचित झाल्यानंतर हल्लेखोर त्यांच्यावर वार करत होते. अगदी अमानुषपणे! सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही.

ही घटना समोर घडत असताना  कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळ परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना कशाचीही भीती न  राहिल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर गुन्हेगारांना अटक करून कडक शिक्षा करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMLAआमदारPoliticsराजकारणbusinessव्यवसाय