वाहनांच्या काचा फोडत टोळक्याने एकास लुटले, काळेवाडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:15 IST2024-02-05T11:14:31+5:302024-02-05T11:15:02+5:30

काळेवाडी येथील डी-मार्ट पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली....

The gang robbed one by breaking the windows of the vehicles, an incident in Kalewadi area | वाहनांच्या काचा फोडत टोळक्याने एकास लुटले, काळेवाडी परिसरातील घटना

वाहनांच्या काचा फोडत टोळक्याने एकास लुटले, काळेवाडी परिसरातील घटना

पिंपरी : चारचाकी वाहनामधून आलेल्या सातजणांनी मिळून शस्त्राचा धाक दाखवत एका व्यक्तीला लुटले. वाहनांच्या काचा फोडत दहशत पसरवली. काळेवाडी येथील डी-मार्ट पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली.

शुभम अशोक तापकीर (वय २३, रा. काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह अन्य सहाजणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महेंद्र प्रकाश सावंत (३७, रा. काळेवाडी) यांनी शनिवारी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे काळेवाडी येथील डी मार्ट पार्किंगमध्ये थांबले होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनामधून सातजण आले. त्यांनी कोयते आणि दगड मारून पार्किंगमधील वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर सावंत यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातून १४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, पार्किंगमध्ये लोकांची गर्दी जमा झाली. संशयितांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली.

Web Title: The gang robbed one by breaking the windows of the vehicles, an incident in Kalewadi area