शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’तील भावाने आम्हाला दागिना परत मिळवून दिला; महिलांकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 09:11 IST

चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळालाचे पाहून काही महिलांना आनंदाश्रू अनावर झाले

पिंपरी : पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी व मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या निगडी येथील मुख्यालयात मंगळवारी (दि. १०) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ८४ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ८४ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळालाचे पाहून काही महिलांना आनंदाश्रू अनावर झाले. आमच्या सौभाग्याच्या लेण्यासाठी पोलिसांनी तपास केला. खाकीतील भावाने मिळवून दिलेला हा दागिना आमच्यासाठी मौल्यवान आहे, असे म्हणून त्यांनी पोलिसांचे तोंडभरून कौतुक केले.  

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, उपस्थित होते. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण ८४ गुन्ह्यांतील ३३ लाख ४३ हजार २४० रुपये किमतीचे ६७९ ग्रॅम ५९० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने व ७३९ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच दोन लाख ४८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन, २० हजार रुपयांचा एक लॅपटॉप, ५१ लाख ५० हजारांची चारचाकी व दुचाकी अशी एकूण २१ वाहने, सहा लाख ७० हजारांच्या सहा रिक्षा, ३७ लाख ५७ हजार ७६५ रुपयांचे टायर व ट्यूब व दोन लाख २१ हजार १०० रुपयांचा इतर मुद्देमाल, असा एकूण एक कोटी, ४६ लाख ९३ हजार ७०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पोलीस आयुक्‍त चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पोलीस आयुक्‍त चौबे म्हणाले, गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तपास करावा लागतो. आरोपीस अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा लागतो. तपासासाठी परराज्यामध्ये असताना पोलिसांना अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरी सुध्दा पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करून आरोपी व त्याच्या साथीदारांकडून मुद्देमाल हस्तगत करून आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाThiefचोर