शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:06 IST

Pune Bridge Collapse: आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.

- विश्वास मोरे Pune Bridge Collapse: रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे.  इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते.  त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.  पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.

 अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.  आणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची  गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.पुल अत्यंत जुना झालेला; प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे.  तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातriverनदीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड