धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर टेम्पोत बलात्कार; चालक, क्लिनर फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:04 AM2020-03-12T10:04:34+5:302020-03-12T10:06:12+5:30

२९ वर्षीय महिलेची आळंदी पोलिसांकडे फिर्याद; टेम्पो चालक व क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

tempo driver and cleaner raped women compliant registered in pimpari chinchwad kkg | धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर टेम्पोत बलात्कार; चालक, क्लिनर फरार

धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर टेम्पोत बलात्कार; चालक, क्लिनर फरार

Next

पुणे : पेरणे फाटा येथे सोडण्यास घेऊन जातो, असे सांगून टेम्पो चालकाने एका महिलेला पिंपरी चिंचवडला आणून तिच्यावर टेम्पोमध्येच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला रात्री अकरा ते ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेनं आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

आळंदीतल्या एका महिलेला टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असे सांगून गाडीत बसवून घेतले. त्यानंतर त्याने टेम्पो पेरणेफाटा येथे घेऊन न जाता पिंपरी चिंचवडच्या दिशेने नेला. त्यानंतर टेम्पोमध्येच तिच्यावर चालक व क्लिनर यांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडला सोडून ते पसार झाले. या घटनेनंतर ही महिला परत आळंदी येथे आली. तिने पोलिसांकडे धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहेकर अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: tempo driver and cleaner raped women compliant registered in pimpari chinchwad kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.