तरुणीचे अश्लील व्हिडीओ तिच्याच बहिणीला पाठवले; मुळशी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:27 IST2024-05-27T14:26:37+5:302024-05-27T14:27:01+5:30

मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे १७ मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला...

Teen sent pornographic videos to her own sister; Incidents in Mulshi Taluka | तरुणीचे अश्लील व्हिडीओ तिच्याच बहिणीला पाठवले; मुळशी तालुक्यातील घटना

तरुणीचे अश्लील व्हिडीओ तिच्याच बहिणीला पाठवले; मुळशी तालुक्यातील घटना

पिंपरी : तरुणीचे नग्न व्हिडीओ आणि फोटो तसेच मेसेज व्हॉट्सॲप वरून पाठवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या बहिणीलाही अश्लील व्हिडीओ, फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली. मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे १७ मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.२६) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणीला व्हॉट्सॲपवरून घाणेरडे मेसेज केले. तसेच तरुणीचे नग्न व्हिडीओ व फोटो तरुणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. फिर्यादी तरुणीच्या बहिणीच्या व्हॉट्सॲपवरही व्हिडीओ, फोटो तसेच घाणेरडे मेसेज पाठवले. यातून अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी तरुणीची बदनामी केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तरुणीचा विनयभंग केला.

याप्रकरणी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार तीन वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून अश्लील व्हिडीओ, फोटो तसेच मेसेज पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अजित खटाळ तपास करीत आहेत.

Web Title: Teen sent pornographic videos to her own sister; Incidents in Mulshi Taluka