शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:20 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

ठळक मुद्देचौथ्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्र व मुंबई परिसरातील प्रचाराचा ज्वर वाढला बारामतीचा प्रचार संपल्यामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे याही मावळात दाखल होणार

हणमंत पाटील पिंपरी : राज्यातील चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे या लढतीसाठी दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरातून शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फौज २९ एप्रिलपर्यंत मावळात तळ ठोकणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा अन् तिसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका २३ एप्रिलला संपल्या आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्र व मुंबई परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेत मावळसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ही निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याच्या प्रचारासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, भाऊ जय आणि चुलतभाऊ रोहित पवार असे संपूर्ण कुटुंब मावळात तळ ठोकून आहे. बारामतीचा प्रचार संपल्यामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे याही मावळात दाखल होणार आहेत. महायुतीकडून हॅट्ट्रिकची तयारी पवार कुटुंबीयाप्रमाणे बारणे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढत आहे. त्यामुळे बारणे यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, युवा नेते आदित्य ठाकरे, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे , नितीन बानगुडे पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, प्रशांत ठाकूर व सुरेश लाड अशी भाजपाशिवसेना नेत्यांची फौज बारणे यांच्या प्रचारासाठी मावळात उतरली आहे. मावळ मतदारसंघात हॅट्रीक करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी मित्रपक्ष असलेला भाजपा व रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्तेही प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजपा व शिवसेनेचे नेते व नगरसेवक पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत..............राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांपेक्षा नेते उदंड ४महाआघाडीची उमेदवारी पार्थ अजित पवार यांना असल्याने नेत्यांची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेते कामाला लागले आहेत. परंतु, कार्यकर्त्यांची कमतरता महाआघाडीच्या प्रचारात दिसून येत आहे. नेते उदंड झाले, कार्यकर्ते सापडेनात अशी स्थिती राष्ट्रवादीची झाली आहे. शिवाय अजित पवार यांच्यावरील प्रेम दाखविण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते मावळ मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री भास्कर जाधव, हर्षवर्धन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार दिलीप सोपल, राहुल मोटे असे नेते तळ ठोकून आहेत. 

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस