शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

बोलक्या भिंती उपक्रमातून चिमुकल्यांना शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:05 AM

चऱ्होली-पठारे मळा शाळा; गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांचा वेगळा प्रयोग

- प्रकाश गायकर पिंपरी : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक विविध प्रयत्न करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांना सुलभ पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी चºहोली पठारे मळा शाळेतील शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. शाळेतील सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत झाली आहे.चºहोली-पठारेमळा या ठिकाणी पूर्वी शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. शाळेच्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामधून पावसाचे पाणी झिरपून वर्गामध्ये येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या शाळेतील पटसंख्याही कमी झाली होती. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन शिक्षकांनी शाळेचे रूप पालटण्याचे ठरवले. शिक्षक अमोल भालेकर व विवेक रासकर यांनी शाळेच्या काळवंडलेल्या भिंतींना बोलके केले. या शिक्षकांनी शाळेतील भिंतींवर विविध रंगांमध्ये चित्रे काढली. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होईल, असे पाठ भिंतीवर रंगवून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. महापालिकेने शिक्षकांची ही धडपड बघून गळके छत व खिडक्या बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती रेखाटल्याने भिंती जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्या आहेत.विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी भिंतीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य, तारांगण, चंद्र, सूर्य, आकाशमाला रेखाटली आहे. तसेच मराठी बाराखडी, मराठी-इंग्रजी महिने, व्याकरण, दिशाज्ञान, गणितीय सापशिडी, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार या गणितीक्रिया करण्यासाठी सूत्रे, वाक्प्रचार गिरविण्यात आले आहेत. पर्यावरणीय माहितीसाठी विविध प्रकारची झाडे, भौगोलिक माहिती, महाराष्ट्र व भारताचा नकाशा, विज्ञान, निसर्गविषयक माहिती, प्राणी-पक्ष्यांची चित्रे काढण्यात आली आहेत. या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व संगीत कलेची माहिती व्हावी या उद्देशाने तबला, पेटी, ढोलकी, वीणा, सारंगी यांसारखी संगीतवाद्ये रंगवली आहेत. त्यामुळे या शाळेबद्दल कुतुहूल वाटत आहे.काही दिवसांपूर्वी शाळेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही दिवसेंदिवस घटत होती. मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही शिक्षकांनी मिळून भिंतीवर आकर्षक चित्रे रंगवली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून मुलांचा शाळेकडे कल वाढला. लोकसहभागातून शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू आहे.- अमोल भालेकर, शिक्षक

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड