तळेगावात भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:37 IST2017-09-16T02:37:06+5:302017-09-16T02:37:26+5:30
बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार गुरुवारी भर दिवसा तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी कॉलनीत घडला.

तळेगावात भरदिवसा घरफोडी
तळेगाव दाभाडे : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार गुरुवारी भर दिवसा तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी कॉलनीत घडला.
या संदर्भात विठ्ठल बाळू कदम (रा. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम घर बंद करून कामानिमित्त गुरुवारी सकाळी ८.३०ला घराबाहेर पडले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास ते परत आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, ते चोरट्यांचा माग काढू शकले नाहीत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.