चिंचवडमध्ये बांधकाम मजुराचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:26 IST2019-02-26T18:25:59+5:302019-02-26T18:26:11+5:30
चिंचवड मधील प्रेमलोकपार्क परिसरात नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीच्या खाली एका मजुराचा मृत देह आढल्याची घटना समोर आली आहे.

चिंचवडमध्ये बांधकाम मजुराचा संशयास्पद मृत्यू
चिंचवड: चिंचवड मधील प्रेमलोकपार्क परिसरात नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीच्या खाली एका मजुराचा मृत देह आढल्याची घटना समोर आली आहे.दिलेश्वर (पूर्ण नाव समजले नाही)वय २३ मुळगाव छत्तीसगड असे या मजुराचे नाव आहे.
सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.दिलेश्वर हा मागील सहा महिन्यांपासून येथील लेबर कॅम्प मध्ये आपल्या मित्रांसह रहात होता.सोमवारी रात्री तो इमारतीच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पाहिले.त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे.या घटनेची माहिती त्याच्या ठेकेदाराला देण्यात आली.त्या नंतर त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या चिंचवड पोलिसांना रक्ताचे डाग पडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्या इतर साथीदारांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.दिलेश्वर बरोबर राहत असलेल्या त्याच्या साथीदारांनी उडवा-उडावीची उत्तरे दिल्याने हा खुनाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे.या घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.