हिंजवडी पोलीस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:34 IST2019-11-15T13:33:35+5:302019-11-15T13:34:55+5:30
माझ्यासोबत चल, असे म्हणणाऱ्या मित्रास तरुणीने नकार दिला...

हिंजवडी पोलीस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : माझ्यासोबत चल, असे म्हणणाऱ्या मित्रास तरुणीने नकार दिला. त्यामुळे तरुणाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर गुरुवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित अनिल पटोकार (वय २८, रा. अमरावती) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया तरुणाचे नाव आहे. एका खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहित याच्या २७ वर्षीय मैत्रीणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणी आणि रोहित गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर होते. त्यावेळी रोहित फिर्यादी तरुणीला म्हणाला, तू माझ्यासोबत चल. मात्र तरुणीने नकार दिला. स्वत:चे बरे वाईट करीन, अशी धमकी देत त्याने स्वत:च्या हाताची नस कोणत्यातरी धारदार वस्तूने कापून स्वत:ला जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात रोहित जखमी झाला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.