शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार टॅब

By admin | Updated: October 13, 2016 02:04 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचा २०१७-१८ या पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांची तरतूद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचा २०१७-१८ या पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीला सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅब, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व बालवाडीसाठी साहित्य आदी या अर्थसंकल्पाचे विशेष आहे. दरवर्षी महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पा अगोदर शिक्षण मंडळातर्फे अंदाजपत्रक मांडले जाते. आगामी महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने आॅक्टोबर महिन्यातच शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. अंदाजपत्रक विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांना अधिक सुविधा पुरविण्यात याव्यात, हा हेतू समोर ठेवूनच शिक्षण मंडळाने अर्थसंकल्प तयार केल्याचे दिसून येत आहे. या अर्थसंकल्पात टॅब खरेदीसाठी ५० लाख, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १० लाख, सौरऊर्जा सिस्टीम ५० लाख, ग्रीन बोर्ड १५ लाख, डस्टबिन २० लाख, वीजरोधक २५ लाख, वॉटर फिल्टर ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठीही विशेष तरतूद केली आहे.यामध्ये गणवेश एक कोटी, दप्तरासाठी २० लाख, स्काऊट गाईड गणवेशासाठी ५ लाख, विद्यार्थी पीटी शूजसाठी ८५ लाख, रेनकोट खरेदीसाठी ३० लाख, सौरऊर्जा सिस्टीम ५० लाख, बालवाडी खेळणी २० लाख, ग्रीन बोर्ड १५ लाख, डस्टबिन २० लाख, वॉटर फिल्टर ५० लाख, वॉटर बॉटल ४५ लाख, वीजरोधक २५ लाख, स्वेटर्स ४० लाख रुपयांची तरतूद सुचविली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत लवकरच हे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये बदल करण्याचा अंतीम अधिकार स्थायी समितीला आहे. (प्रतिनिधी)